ममता बॅनर्जींच्या दहा वर्षांच्या काळात बंगाल झाले कंगाल, रामदास आठवलेंनी केली टीका

रामदास आठवले २ दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर(ramdas athavale 2 days west bengal visit) येथे आले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत(west bengal election) रिपब्लिकन पक्षाचे १५ उमेदवार स्वबळावर निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यावर रामदास आठवले पश्चिम बंगालमध्ये आले आहेत.

    कोलकाता: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee)यांनी त्यांच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात पश्चिम बंगालला कंगाल केले आहे, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारुकेश्वर विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार संजीव चक्रवर्ती यांच्या प्रचारसभेत रामदास आठवले बोलत होते.

    रामदास आठवले २ दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर(ramdas athavale 2 days west bengal visit) येथे आले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे १५ उमेदवार स्वबळावर निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यावर रामदास आठवले पश्चिम बंगालमध्ये आले आहेत.

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा असून रिपाइं १५ जागा स्वबळावर लढत असुन उर्वरित २७९ जागांवर रिपाइंचा भाजपला पाठिंबा आहे. पश्चिम बंगालमध्ये दलितांची लोकसंख्या ३६ टक्के असून दलितांचे मतदान निर्णायक ठरणारे आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने बंगालला कंगाल केले आहे. मात्र पश्चिम बंगालला सोनार बंगाल करण्यासाठी येथील दलितांचा पाठिंबा भाजपला मिळणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे १५ उमेदवार विधान निवडणूक लढत असून त्यात जे उमेदवार विजयी होतील त्यांचा भाजपला पाठिंबा राहील,अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली.

    आमदार पक्षातून बाहेर पडण्याचा विक्रम

    ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सोडून आतापर्यंत ६४ आमदार बाहेर पडले आहेत. अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडला आहे. एखादा पक्ष सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी बाहेर पडण्याचे देशात तृणमूल काँग्रेस हे एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालला सोनार बंगाल करण्यासाठी भाजप ला संधी मिळेल. पश्चिम बंगालचे दलित आणि अल्पसंख्यांक भाजप ला विजयी करतील. पश्चिम बंगालच्या विकासासाठी रिपाइं आणि भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.