sadhvi pradnya thakur

भोपाळच्या भाजपा खासदार असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragyasingh Thakur) यांनी भारतात हिजाब घालण्याची गरजच नाही, असं म्हटलं आहे.

    गेल्या काही दिवसांपासून हिजाब प्रकरणावरून (Hijab Row) वाद सुरु आहे. कर्नाटकमधून (Karnataka) सुरू झालेल्या या हिजाब प्रकरणाचे (Hijab Controversy) पडसाद देशाच्या इतरही काही भागांमध्ये उमटू लागले आहेत. इतकंच काय, काही केंद्रीय नेतेदेखील यासंदर्भात विधानं करू लागले आहेत. यामध्ये आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचादेखील समावेश झाला असून त्यांनी नुकत्याच केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. भोपाळच्या भाजपा खासदार असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragyasingh Thakur) यांनी भारतात हिजाब घालण्याची गरजच नाही, असं म्हटलं आहे.

    साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिजाब प्रकरणावर केलेल्या विधानावरून वाद सुरू झाला आहे. “हिंदू सनातनी परंपरा मानतात. हिंदू धर्मात महिलेला देवीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे हिंदू महिला सुरक्षित असतात”, असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच, शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालून आलेलं चालणार नाही, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

    “मुस्लीम महिलांनी मदरशांमध्ये हिजाब घालून जावं. पण शाळा-कॉलेजांमध्ये हिजाब घालून जाणं चालणार नाही. मुस्लीम महिलांना त्यांच्या घरातच हिजाब घालायला हवा, कारण त्यांना त्यांच्या घरातच त्रास होत असतो”, असं त्या म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना प्रज्ञा ठाकूर यांनी हिजाब आणि खिजाबची तुलना केली आहे.

    “खिजाबचा उपयोग वय लपवण्यासाठी केला जातो, तर हिजाबचा उपयोग चेहरा लपवण्यासाठी केला जातो. मुस्लिम महिलांना त्यांचे काका, मामा, मामाच्या मुलांकडून धोका असतो. त्याामुळे त्यांनी घरातच हिजाब घालायला हवा”, असं प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या आहेत.