चालकाच्या निष्काळजीपणामुळे आठ जणांनी गमावला जीव

    रौता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उनगढच्या कांजिया मिडल स्कूलजवळ अपघाता(Accident)ची ही घटना घडली आहे. स्कॉर्पिओ (Scorpio)मध्ये बसलेले सर्व जण अंगढ येथील रालखापरा ताराबारीसोबत लग्नाचे नाते ठरवून किशनगंज (Kishanganj) जिल्ह्यातील नुनिया गावी जात होते. यावेळी स्कॉर्पिओ अचानक खड्ड्यात पडली. ज्यामध्ये गाडीतील आठ जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे.

    चालकाच्‍या निष्काळजीपणामुळे बिहारमधील रौता येथे अपघात झाला आहे. अपघातामुळे लोकांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी, आवाज ऐकून आजूबाजूच्‍या लोकांनी अपघाताच्या ठिकाण धाव घेट जखमींसह मृतांना गाडीतून बाहेर काढले. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसही दाखल झाले. तपासात वाहनाचा वेग आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे.