Secret treasure found by river bank in Uttar Pradesh

भारतात कधीकाळी सोन्याचा धूर निघत होता असे बोलले जाते. मात्र मधल्या काळात झालेल्या परकीय आक्रमणांमुळे देशाची हानी झाली. या काळात अनेक गडगंज श्रीमंत व्यक्तींनी भीतीमुळे आपल्याकडील मौल्यवान संपत्ती लपवून ठेवली. मात्र त्यांच्या निधनानंतर ही संपत्ती रहस्य बनून राहिली. हीच संपत्ती कधी-कधी बाहेर येते आणि लोकांना मालामाल करते. उत्तरप्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातही सध्या अशाच एका संपत्तीची चर्चा सुरू आहे(Secret treasure found by river bank in Uttar Pradesh).

  येथे पावसामुळे नरायच गावातील नदीकिनाऱ्यावर असणारा मातीचा ढिगारा फुटला आणि त्यातून ब्रिटिशकाळातील सोने-चांदीचे शिक्के बाहेर पडू लागले. गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी कुदळ-फावडा घेऊन नदीकिनारी धाव घेतली. गावकऱ्यांनी मिळेल तेवढे शिक्के घेऊन येऊन पळ काढला.

  गावात दुर्मीळ शिक्के सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि अधिकाऱ्यांनी काही गावकऱ्यांकडून हे शिक्केही जप्त केले आहेत. अचानक हे घबाड सापडल्याने येथे पोलिसांचे एक पथकही तैनात करण्यात आले आहे. तसेच जे गावकरी शिक्के घेऊन फरार झाले त्यांचाही शोध सुरू आहे.

  दरम्यान, नदीकिनारी दुर्मीळ शिक्के सापडत असल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी येथे धाव घेत खोदकाम सुरू केले. या दरम्यान गावकऱ्यांना काही शिक्केही सापडले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने गर्दीही वाढू लागली. लोक मिळेल त्या हत्याराने खोदकाम करू लागले आणि शिक्के सापडू लागले. मात्र पोलिसांनी येथे धाव घेत हा सरकारी खजाना असल्याचे सांगत आतापर्यंत 20 शिक्के जप्त केले आहेत.

  हे सुद्धा वाचा
  • 2022