जम्मूमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे.

    जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे. यादरम्यान, कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) दोन सैनिक शहीद झाले.

    दोन जवानांच्या मृत्यूमुळं आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांची संख्या 9 वर पोहोचली आहे. पुंछच्या सुरणकोटे जंगलात सोमवारी सुरू झालेल्या कारवाईत आतापर्यंत नऊ सैनिक शहीद झाले आहेत. दरम्यान, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.