नवरीचा चेहरा पाहून लग्नाच्या मांडवातून पळाला नवरदेव, नंतर काय घडलं ? : वाचा सविस्तर

भरल्या मंडपातून नवरा मुलगा अचानक पळून गेल्यामुळे वधूला आणि तिच्या कुटुंबियांना, पाहुण्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी नवऱ्या मुलाच्या वडिलांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की जेव्हा मुलीचा फोटो त्यांना दाखवण्यात आला त्या फोटोतली मुलगी वेगळीच होती. सदर नवऱ्या मुलाने फोटो पाहून त्या फोटोतल्या मुलीशी लग्न करण्यास संमती दिली होती. मात्र लग्नाच्या मंडपात एक वेगळीच मुलगी होती. या प्रकारामुळे नवरा मुलगा गोंधळला आणि त्याने भरल्या मंडपातून पळ काढला.

  नवी दिल्ली : आपण चित्रपटांमध्ये किंवा कथांमध्ये नेहमी वाचतो की वधू लग्नाच्या मंडपातून पळून गेली पण उत्तर प्रदेशातल्या इटावा जिल्ह्यात मात्र चक्क एक नवरा मुलगा मांडवातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथेही नेहमीप्रमाणे वरात नवऱ्या मुलाला घेऊन लग्नमंडपात पोहोचली. वधूकडच्या लोकांनी वरातीचे थाटामाटात स्वागत केले.

  मात्र त्यानंतर नवरा मुलगा भरल्या मंडपातून पळून गेला. इतकेच नव्हे, तर लग्नात सहभागी होण्यासाठी जमलेले पाहुणेही पळून गेले. तिथे सर्वांनी या नवऱ्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो हाती लागला नाही. शेवटी नवरीच्या नातेवाईकांनी त्याच्या वडिलांना त्याच्या पलायनामागचे कारण विचारले.

  मुलीचा चेहरा पाहून नवऱ्या मुलाला बसला धक्का

  भरल्या मंडपातून नवरा मुलगा अचानक पळून गेल्यामुळे वधूला आणि तिच्या कुटुंबियांना, पाहुण्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी नवऱ्या मुलाच्या वडिलांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की जेव्हा मुलीचा फोटो त्यांना दाखवण्यात आला त्या फोटोतली मुलगी वेगळीच होती. सदर नवऱ्या मुलाने फोटो पाहून त्या फोटोतल्या मुलीशी लग्न करण्यास संमती दिली होती. मात्र लग्नाच्या मंडपात एक वेगळीच मुलगी होती. या प्रकारामुळे नवरा मुलगा गोंधळला आणि त्याने भरल्या मंडपातून पळ काढला. फोटोतली मुलगी आणि प्रत्यक्ष लग्नाला उभी असलेली मुलगी वेगवेगळी असल्याचा आऱोप मुलाच्या वडिलांनी केल्यानंतर मुलीच्या बाजूच्या लोकांनी सांगितले की ज्या मुलीचा फोटो वराकडच्यांना दाखवण्यात आला होता तीच मुलगी लग्नाच्या मंडपात होती. इतकेच नाही, तर मुलाकडच्यांनी मुलीला पुन्हा एकदा पाहून खात्री करून घ्यावी असेही त्यांनी सांगितले. यानंतर काही मंडळींनी नववधूचा चेहरा पाहिला, पण त्यांनाही काहीतरी गोंधळ असल्याचे जाणवले. अखेर हे प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत पोहोचले.

  हुंड्यासाठी वराकडच्यांनी प्रकार केल्याचा आरोप

  प्रकरण पोलीस स्थानकात गेल्यानंतर वधूकडच्या लोकांनी असा आरोप केला की वराकडचे लोक हे हुंड्यासाठी असे प्रकार करत आहेत. शेवटी पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि हुंड्यापोटी मुलीच्या कुटुंबाकडून वराकडच्यांना दिलेले सर्व सामान त्यांना परत करायला लावले. यानंतर प्रकरण मिटले आणि दोन्ही कुटुंबे आपापल्या घरी गेली.