नर्सला कोरोनाचे संक्रमण झाल्याने  सासरच्या लोकांनी काढले घराबाहेर

नर्सला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजले त्यावेळी तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढले. घरी परत यायचे असेल तर १० लाख रुपये सोबत आणावेत किंवा तलाक द्यावा असे नर्सला आता तिच्या सासरीच्या मंडळींनी सांगितले आहे.

    गुजरात: देशात सर्वत्रचा कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढ आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. मात्र यासगळ्यामध्ये फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून आरोग्य सेवेतील आरोग्य सेवक काम करत आहे. अनेकदा आपल्या कुटुंबियांपासून लांब राहत आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत,परंतु या दरम्यान एका धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने एका नर्सला तिच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील इसनपूर भागात घडली आहे.

    इतकेच नव्हेतर सासरच्या मंडळींनी तिला घरात पुन्हा घेण्यासाठी तिच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली आहे. ज्यामुळे नर्स सध्या आपल्या माहेरी राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील इसनपूर भागात राहणाऱ्या २७ वर्षीय नर्सने याबाबत खोखरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत खोखरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी २०२० मध्ये तिचा विवाह झाला.
    नर्सचा ज्यावेळी विवाह झाला त्यावेळपासूनच ती मणिनगर येथील एलजी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. सासरकडील मंडळींना तिचे हे काम करणे पसंत नव्हते. त्यामुळे तिच्या सासरचे लोक तिला त्रास देत होते. एप्रिल २०२०मध्ये जेव्हा या नर्सला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजले त्यावेळी तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढले. घरी परत यायचे असेल तर १० लाख रुपये सोबत आणावेत किंवा तलाक द्यावा असे नर्सला आता तिच्या सासरीच्या मंडळींनी सांगितले आहे. अशी माहिती नर्सने पोलिसांना दिली आहे.
    मी माझ्या सासरच्या लोकांशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते समजून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे मला दुःख झाले असून मी सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून मी माहेरी राहत असून, मला माझा पती भेटायला देखील आलेला नाही अशी माहिती त्या नर्सने दिली आहे.