भाषण देत असताना विधानसभेतच सिद्धरामय्या यांचं सुटलं धोतर, अन् पुढे काय झालं तुम्हीच वाचा

सिद्धारमय्या(Siddaramaiah Dhoti Fall Down In Assembly) विधानसभेत भाषण देत असताना त्यांचं धोतर सुटलं. ही गोष्ट समोर आल्यानंतर सिद्धारमय्या यांच्यासह विधानसभेतील उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र कोरोनामुळे वजन वाढल्यानं धोतर कंबरेवर राहत नसल्याचं स्पष्टीकरण सिद्धारमय्या(Siddaramaiah In Assembly) यांनी दिलं.

    माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे(karnatak) विरोधी पक्षनेते सिद्धारमय्या(Siddaramaiah Dhoti Fall Down In Assembly) विधानसभेत भाषण देत असताना त्यांचं धोतर सुटलं. ही गोष्ट समोर आल्यानंतर सिद्धारमय्या यांच्यासह विधानसभेतील उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र कोरोनामुळे वजन वाढल्यानं धोतर कंबरेवर राहत नसल्याचं स्पष्टीकरण सिद्धारमय्या(Siddaramaiah In Assembly) यांनी दिलं. कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धारमय्या विधानसभेत म्हैसुर बलात्कार प्रकरणावर(Mysore Rape Case) बोलत होते.

    यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी त्यांच्याजवळ येत त्यांना अडवले आणि त्यांच्या कानात सांगितले की, त्यांचं  धोतर सुटलंय आणि खाली पडेल. यावर सिद्धारमय्या “अरे, असं आहे का?” म्हणत जागेवर बसले.  मी धोतर बांधल्यानंतर भाषण पुन्हा चालू करेल, असं म्हणाले. तसंच कोरोनातून बरं होताना माझं ४-५ किलो वजन वाढलंय. त्यामुळे पोट मोठं झालंय आणि धोतर लहान होतंय. त्यामुळे धोतर कंबरेवर राहत नाही, असंही सिद्धारमय्या यांनी सभागृहात सांगितलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

    पुढे मंत्री के एस ईश्वरप्पा यांना आवाज देत ते म्हणाले, “ईश्वरप्पा माझं धोतर पडलंय. माझं पोट वाढलंय, त्यामुळे माझं धोतर सतत खाली पडतंय. तर यावेळी ट्रेजरीमध्ये बसलेल्या कोणीतरी त्यांना मदतीची ऑफर दिली. तेव्हा सिद्धरामय्या म्हणाले, “तुम्ही दुसऱ्या बाजूला बसलेला आहात, त्यामुळे मी तुमच्याकडे मदत मागणार नाही.”