बाल्कनीमध्ये बसला असता अचानक खाली कोसळला आणि…धक्कादायक Video व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा केरळमधील आहे. हा व्हिडिओ एका घराच्या बाल्कनीतील आहे. दोन व्यक्ती ब्लाकनीत उभे असलेले दिसतात. त्यापैकी गुलाबी शर्ट घातलेल्या व्यक्तीला चक्कर येते आणि तो जवळपास ब्लाकनीतून रस्त्याच्या बाजूला पडल्यात जमा असतो. यावेळी त्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीच्या ते लक्षात येते. तो पटकन गुलाबी शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या पायाला पकडतो. इतक्यात इतर लोक जमा होतात. दुचाकीस्वार, एक पोलीस अधिकारी येतो आणि त्या व्यक्तीला वर ओढून त्याचा जीव वाचवताना दिसत आहे.

    सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आज एक धक्कादायक आणि मनाला कापरे भरेल असं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केरळमधील असल्याचं समोर आलं आहे. बाल्कनीतून खाली पडत असलेल्या व्यक्तीचा एका व्यक्तीच्या समयसूचकतेमुळे जीव वाचतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा केरळमधील आहे. हा व्हिडिओ एका घराच्या बाल्कनीतील आहे. दोन व्यक्ती ब्लाकनीत उभे असलेले दिसतात. त्यापैकी गुलाबी शर्ट घातलेल्या व्यक्तीला चक्कर येते आणि तो जवळपास ब्लाकनीतून रस्त्याच्या बाजूला पडल्यात जमा असतो. यावेळी त्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीच्या ते लक्षात येते. तो पटकन गुलाबी शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या पायाला पकडतो. इतक्यात इतर लोक जमा होतात. दुचाकीस्वार, एक पोलीस अधिकारी येतो आणि त्या व्यक्तीला वर ओढून त्याचा जीव वाचवताना दिसत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चक्कर आल्यानं बेशुद्ध झालेली व्यक्ती जवळपास बाल्कनीतून खाली पडल्यात जमा असताना त्या शेजारी उभा राहिलेला व्यक्ती त्याचा पाय पकडतो. थोड्या वेळात बाकीचे लोक येऊन त्याचा जीव वाचवतात. चक्कर आलेल्या व्यक्तीचं नाव बिनू असल्याचं समोर आलं आहे. तसेच हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.