रायपूर रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये भीषण स्फोट, CRPF चे सहा जवान जखमी

 रायपूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमधील एका डब्यात भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोटात सीआरपीएफचे सहा जवान जखमी झाले आहेत.

    रायपूर – रायपूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमधील एका डब्यात भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोटात सीआरपीएफचे सहा जवान जखमी झाले आहेत. या स्फोटाची माहिती मिळताच घटस्थळी रेल्वे, सीआरपीएफचे अधिकारी दाखल झाले आहेत. जखमी जवानांना उपराचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    सीआरपीएफची 211 वी बटालियन स्पेशल ट्रेनने रवाना होणार होती. या जावानांना घेऊन जाणारी ट्रेन रायपूर रेल्वे स्थानकात उभी होती. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक एक मोठा आवाज आला. यानंतर ट्रेनमधील एका डब्यात स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली.