उत्तर प्रदेशमध्ये लालच दाखवून धर्मांतर करणाऱ्या टोळीचा पर्दाफार्श; धर्मांतरणासाठी आयएसआयचं (ISI) फंडिंग

या धर्मांतरणासाठी आयएसआय(ISI) फंडिंग करत असल्याचं समोर आलं आहे. धर्मांतरणानंतर संबंधित महिलांचे विवाहदेखील लावून देण्यात आले आहेत. या कामासाठी एक संपूर्ण टोळीच कार्यरत होती.

    लखनौ: विविध प्रकारच्या वादग्रस्त कारणामुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेश राज्य आता एका नवीन प्रकरणामुळं चर्चेत आलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये(Uttar Pradesh) लालच दाखवून हिंदूसह(Hindu) इतर धर्मातील लोकांचं धर्मांतरण(Conversion) करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
    उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी या रॅकेटची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. या रॅकेटद्वारे आतापर्यंत एक हजार लोकांचं धर्मांतरण करण्यात आलं आहे. याप्रकरणी आरोपींना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे, असं प्रशांत कुमार यांनी सांगितलं.

    धर्मांतर केलेल्या अनेक कुटुंबामध्ये बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधिर लोकांचा समावेश आहे. धर्मांतरण करण्यात येत होतं. सर्वात धक्कदायकबाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआय(ISI) फंडिंग करत असल्याचं समोर आलं आहे. धर्मांतरणानंतर संबंधित महिलांचे विवाहदेखील लावून देण्यात आले आहेत. या कामासाठी एक संपूर्ण टोळीच कार्यरत होती. या लोकांचे रॅकेट आणखीही काही राज्यांत सक्रिय असल्याचेही समोर आले आहे.