पहिली ते आठवीपर्यंतचे सगळे विद्यार्थी पास, पुढील वर्षी ओडिशात जादा तासिका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली आणि आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय ओडिशा प्रशासनानं घेतला आहे. विद्यार्थ्यांना कोरोना काळात परीक्षेचा तणाव जाणवू नये आणि परीक्षेसाठी शाळेत येण्याची गरज भासू नये, यासाठी ओडिशा सरकारनं हा निर्णय घेतलाय. यामुळं होणारं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात २ ते ३ महिने विद्यार्थ्यांचे जादा क्लासेस घेण्याचं नियोजन असल्याचंही सरकारनं जाहीर केलंय. 

    गेल्या काही आठवड्यांपासून देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं चित्र दिसलं. मात्र त्यानंतर अचानक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागल्याचं दिसतंय. या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली आणि आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय ओडिशा प्रशासनानं घेतला आहे. विद्यार्थ्यांना कोरोना काळात परीक्षेचा तणाव जाणवू नये आणि परीक्षेसाठी शाळेत येण्याची गरज भासू नये, यासाठी ओडिशा सरकारनं हा निर्णय घेतलाय. यामुळं होणारं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात २ ते ३ महिने विद्यार्थ्यांचे जादा क्लासेस घेण्याचं नियोजन असल्याचंही सरकारनं जाहीर केलंय.

    सर्व सरकारी, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांना सरकारचा हा आदेश लागू असणार आहे. त्यापूर्वी, वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेता नववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारनं घेतलाय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन या वर्गातील मुलांना परीक्षा न घेताच पास करण्यात येईल, अशी घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केलीय. विद्यार्थ्यांच्या जिवाला कुठलाही धोका उद्भवू नये, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. मात्र आता सुट्टी नको, शाळा सुरू करा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. वर्षभर घरी बसून वैतागलेल्या विद्यार्थ्यांना आता सुट्टीपेक्षाही शाळा सुरू होण्याची आस लागली आहे.