हु…रं! झाली झाली; सर्वोच्च न्यायालयाने दिली बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी, आता निस्ता धुरळा

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, बैलगाडा शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे शेतकरी नाराज झाले होते ही बंदी उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर आज बैलगाडा शर्यतीला परवानी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निश्चितच सर्वांना आनंद झाला आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की, ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवनागी दिली आहे त्यानुसार सर्वांनी नियमांचे पालन करुनच शर्यतीचं आयोजन करावं.

    नवी दिल्ली : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आज सुनावणीच्या सुरुवातीला मुकुल रोहतगी यांचा राज्य शासनाकडून युक्तिवाद केला.

    राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, बैलगाडा शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे शेतकरी नाराज झाले होते ही बंदी उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर आज बैलगाडा शर्यतीला परवानी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निश्चितच सर्वांना आनंद झाला आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की, ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवनागी दिली आहे त्यानुसार सर्वांनी नियमांचे पालन करुनच शर्यतीचं आयोजन करावं.

    सर्वोच्च न्यायालायने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की,ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्धी लढाई पार झाली आहे. आता भिर्र होणार, फक्त सर्वांनी नियम पाळून शर्यती घ्याव्यात असंही कोल्हेंनी म्हटलं आहे.

    दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यात आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि सात वर्षांनंतर आता राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.