आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू  ; पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

हंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह एका पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. तसेच ज्या घरात गिरी यांचा मृतदेह लटकलेला होता, त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते. पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असू शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

    लखनऊ: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी (Akhada Parishad president Narendra Giri Death) यांचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना नुकतीच  उघडकीस आली आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

    घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आयजी केपी सिंह तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनीदेखील नरेंद्र गिरी यांचा मृतदेह ज्या ठिकाणी फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला त्या ठिकाणाची पाहणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह एका पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. तसेच ज्या घरात गिरी यांचा मृतदेह लटकलेला होता, त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते. पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असू शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

    महंत नरेंद्र गिरी यांचे निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे.

    उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी देव हे दु:ख पचवण्याची शक्ती प्रदान करो, असे म्हटलं आहे. तसेच गिरी यांचे निधन ही आमच्यासाठी मोठी हानी आहे. गिरी यांच्या आत्म्याला शांती मिळो, असेही यादव म्हणाले आहेत.