sakshi maharaj

दोन बनावट चेकद्वारे(Duplicate Cheque) ठगांनी साक्षी महाराजांच्या बँक खात्यातून ९७ हजार ५०० रुपये काढून घेतले.

    दिल्ली: भाजपाचे खासदार साक्षी महाराज(Fraud With Sakshi Maharaj) यांच्या बँक खात्यातून ठगांनी पैसै काढले आहेत. दोन बनावट चेकद्वारे ठगांनी साक्षी महाराजांच्या बँक खात्यातून ९७ हजार ५०० रुपये काढून घेतले. नवी दिल्लीचे पोलीस उपअधीक्षक दीपक यादव यांनी ही माहिती दिली.यादव म्हणाले, याप्रकरणी निहाल सिंह आणि दिनेश राय नावाच्या आरोपींना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. एक हजाराहून अधिक लोकांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये काढून घेतल्याचे आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितले.

    खासदार साक्षी महाराज यांनी या प्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. एखाद्याने त्यांच्या एसबीआय बँक खात्यातून दोन बनावट धनादेशासह ९७,५०० रुपये काढून घेतल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. खासदारांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की ज्या चेकमधून पैसे काढले गेले आहेत तेच चेक त्यांच्याकडे आहेत.

    पोलिसांनी एसबीआय बँकेतून माहिती काढली असता, आरोपींनी खासदार साक्षी महाराज यांच्या बँक खात्याला तीन बनावट चेक लावले होते. दिनेश राय निहाल याला बनावट चेक देत असत. हे चेक वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करून ते पैसे काढायले. या कामासाठी त्याला फसवणूक झालेल्या रकमेच्या ३० टक्के कमिशन मिळायचे.

    दिनेश राय यांनी चौकशी दरम्यान सांगितले की, तो बनावट चेक छापत असायचा आणि त्यानंतर तो बँकांमध्ये जमा करायचा. पोलीस दिनेश रायची अधीक चौकशी करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी बँकांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी चेक लावत असत. ५० हजार आणि त्याहून अधिकचा चेक लावल्यास बँक संबंधित ग्राहकाला माहिती देते.

    हे आरोपी देशभरात बनावट चेकव्दारे फसवणूक करत आहेत. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचा पोलिासांना संशय आहे. कारण बँक कर्मचारी चेक नंबर, खाते क्रमांक आणि सही बाबत माहिती पुरवत असतील, असे पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.