दाक्षिणात्य सुपरस्टार राजकारणात प्रवेश करणार ; अलागिरींचे पत्ते गुलदस्त्यात

अलागिरी हे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे थोरले पुत्र आहेत. त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे अभिनेता रजनीकांत यांचाही पुढील वर्षी राजकारणात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच संकेत दिले होते.

चेन्नई : पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये निवडणुका (Tamil Nadu Elections) होणार आहेत. अशा परिस्थितीत राज्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, माजी द्रमुक प्रमुख एम.के. अलागिरी पुन्हा एकदा राजकारणात पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. अलागिरी हे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे थोरले पुत्र आहेत. त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे अभिनेता रजनीकांत यांचाही पुढील वर्षी राजकारणात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच संकेत दिले होते. आता अलागिरी यांनीही राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिल्याने चर्चांना ऊत आला आहे.
नव्या पक्षाचे सूतोवाच, पण द्रमुकला पाठिंबा नाही

दुसऱ्या यूपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले अलागिरी यांनी गुरुवारी गोपालपुरम निवासस्थानी उपचार घेत असलेल्या आई दयालु अम्माल यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. आलागिरी म्हणाले की, ३ जानेवारीला ते समर्थकांशी चर्चा करतील आणि नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याबाबत निर्णय घेतील. ते म्हणाले, माझ्या समर्थकांनी मी नवीन पार्टी सुरू करावीत अशी इच्छा असल्यास, मी तसे करीन. परंतु मी द्रमुकचे समर्थन करणार नाही. त्यांनी मला स्पष्टीकरण दिले की, मला द्रमुकच्या वतीने पुन्हा पक्षात येण्याचे आमंत्रण देण्यात आले नाही, असे ते म्हणाले.

रजनीकांत यांचीही घेणार भेट

भारतीय जनता पक्षाने अलागिरी यांना आपल्या बाजूने आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मार्ग सुकर करण्यात भाजपव्यस्त आहे. आहे. रजनीकांत यांची भेट घेतल्याच्या मुद्यावर बोलताना अलागिरी यांनी अभिनेता सध्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे कळले असून हैदराबादहून ते परतताच त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कौटूंबीक वर्चस्ववाद

(एम.के. स्टॅलिन)
– लहान भाऊ एम.के. स्टॅलिन यांच्यासोबत झालेल्या वादामुळे अलागिरी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

– हकालपट्टी होण्यापूर्वी त्यांना पक्षाचे मानाचे स्थान होते. पक्षावर त्यांची पकड होतीच शिवाय निवडणूक आघाडीपासून प्रचारापर्यंत पक्षाच्या निर्णयांवर त्यांचा मोठा प्रभावही होता.
लहान भाऊ एम.के. स्टॅलिन यांची वाढती लोकप्रियता आणि वडिलांचा मिळणारा पाठिंबा यामुळे अलागिरी यांचा अपेक्षाभंग झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत द्रमुकची सूत्रे सांभाळणाऱ्या करुणानिधी यांच्या हाती सर्व सूत्रे असतानाही त्यांनी अलागिरींची हकालपट्टी केली होती. २०१४ मध्ये त्यांनी दक्षिण संघटन सचिवपदावरून अलागिरींची हकालपट्टी केली होती. त्यावेळी करुणानिधी यांनी अलागिरी यांचे पक्षात कोणतेही स्थान नाही असे स्पष्ट केले होते.