burns-note

लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे (एसीबी) (ACB)अधिकाऱ्यांनी एका तहसीलदाराच्या घरावर छापा(ACP raid) टाकला. मात्र अधिकारी घरात जायच्या आधीच या तहसीलदाराला त्याविषयीची माहिती मिळाली होती. त्याने स्वत:ला घरात कोंडून घेतलं आणि घरातील स्टोव्हवर लाखो रुपयांच्या(tehsildar burns 20 lakh) नोटा जाळल्या.

    राजस्थानमध्ये(rajasthan) एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला आहे. एका तहसीलदाराने १५ ते २० लाख रुपये किमतीच्या नोटा स्टोव्हवर जाळल्या असल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे (एसीबी) (ACB)अधिकाऱ्यांनी या तहसीलदाराच्या घरावर छापा(ACP raid) टाकला. मात्र अधिकारी घरात जायच्या आधीच या तहसीलदाराला त्याविषयीची माहिती मिळाली होती. त्याने स्वत:ला घरात कोंडून घेतलं आणि घरातील स्टोव्हवर लाखो रुपयांच्या(tehsildar burns 20 lakh) नोटा जाळल्या.

    सिरोही जिल्ह्यातील पिंडवाडा तहसीलमधील जमीन अभिलेख निरीक्षक असणाऱ्या परबत सिंहला एक लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडलं. याचं प्रकरणामधील तहसीलदाराला पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची टीम गेली. त्यावेळी त्याने स्वत:ला कोंडून घेतलं. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला.

    तहसीलदार कल्पेश कुमार जैन असं या तहसीलदाराचं नाव आहे. एका कंत्राटदाराकडून सरकारी कंत्राट देण्याच्या नावाखाली कल्पेशने लाच मागितली. तशी माहिती कार्यालयामध्ये काम करणाऱ्या परबत सिंहने लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक बीएल सोनी यांना दिली आहे.

    जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परबत सिंहच्या माहितीनुसार तहसीलदाराच्या निवासस्थानी छापा टाकला तेव्हा  कल्पेशने स्वत:ला कोंडून घेतलं. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकारी घरात शिरू शकले नाहीत.हे अधिकारी घराबाहेरुन कल्पेशला दरवाजा उघडण्यास सांगत होते. त्यावेळी त्याने घरामध्ये १५ ते २० लाखांच्या नोटा जाळून टाकल्या.

    अनेक प्रयत्नानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी या घरात घुसले तेव्हा त्यांना किचनमध्ये जाळलेल्या नोटा आणि दीड लाख रुपये रोख रक्कम मिळाली. या प्रकरणामध्ये कल्पेश आणि परबत सिंह दोघांनाही अटक करण्यात आली आहे अशी माहिती सोनी यांनी दिली आहे.