बलात्कार करुन रक्तबंबाळ केले; नंतर कारमधून संपूर्ण शहरात फिरवले आणि मग…. मूकबधीर मुलीवर झालेला अत्याचर पाहून पोलिसही हादरले

नराधमांनी एका मूकबधीर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिला राजस्थानच्या अलवरच्या फ्लायओव्हरवर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे(Terrible gang rape of a deaf and dumb girl in Rajasthan). या मुलीवर बलात्कार करुनच हे नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी टोकदार वस्तूने मारहाण करत तिला जखमीही केले.

  अलवर : नराधमांनी एका मूकबधीर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिला राजस्थानच्या अलवरच्या फ्लायओव्हरवर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे(Terrible gang rape of a deaf and dumb girl in Rajasthan). या मुलीवर बलात्कार करुनच हे नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी टोकदार वस्तूने मारहाण करत तिला जखमीही केले.

  मूकबधीर असल्याने ही पीडित मुलगी ओरडूही शकली नाही. बलात्कारानंतर गाडीतून ते तिला संपूर्ण शहरात फिरत होते, मात्र तिच्या जखमांमधील रक्तस्राव थांबत नसल्याचे पाहून, या नमराधमांनी तिला अखेरीस अलवरच्या फ्लायओव्हरवर टाकून दिले. ही मुलगी अशी जखमी अवस्थेत त्या फ्याओव्हरवर जवळपास एक तास पडून होती. दोन फुटांचा रस्ता तिच्या रक्ताने लाल झाला होता.

  मुकी आणि बहिरी असल्याने ती कुणाला मदतीसाठीही बोलवू शकत नव्हती. अखेरीस रस्त्यावरुन जाणाऱ्या काही जणांनी तिला पाहिल्यावर त्यांनी पोलिसांना सूचना दिली. रात्री ९च्या सुमारास तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्धवट शुद्धीत तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले.

  सुरुवातीला या मुलीला पाहिल्य़ानंतर तिची मानसिक स्थिती ठीक नसेल असे डॉक्टरांना वाटले होते, मात्र त्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात ले की मूकबधीर आहे. रात्री ११ च्या सुमारास या मुलीची आई आणि मामा हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर त्या मुलीचे वय १६ असून ही मूकबधीर असल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास ती घरातून बाहेर पडली होती, त्यानंतर तिचा शोध लागत नव्हता. तिचे कुणी अपहरण केले होते की स्वता या नराधमांसोबत गेली होती, याचा तपास लागू शकलेला नाही.

  पीडितेची जखम गंभीर

  या मुलीचे रक्त खूप जास्त वाहिले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच तिच्या गुप्तांगाला मोठी जखम झाली आहे. एखाद्या टोकदार अस्त्राने ही दुखापत करण्यात आली आहे. त्यामुळे तिचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे.

  अलवरच्या हॉस्पिटलमध्ये तिला दोन बाटल्या रक्तही देण्यात आले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जयपूरला पाठवण्यात आले हे. तिथे जेके लॉन रुग्णालयात या मुलीवर पुढील उपचार सुरु आहेत. या मुलीचे ऑपरेशनही करण्यात आले आहेत. सरकारने या मुलीच्या उपचारासाठी साडे तीन लाख रुपयांची मदत दिली आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022