जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहेत. यामध्ये एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहेत. यामध्ये एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाहपोहच्या स्टेनफोर्ड या शाळेच्या समोर दहशतवाद्यांनी रेल्वे पोलीस अधिकारी बंटू शर्मा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात शर्मा गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

    दरम्यान, या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय आहे, हे अद्यापही अस्पष्ट आहे. तसेच यामध्ये किती दहशतवादी होते आणि कोणती संघटना होती. याबाबत माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये.