terrorists

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी (terrorist attack) घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी माजी एसपीओ फैयाज अहमद (SPO Fayaz Ahmad ) आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली.

    श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी (terrorist attack) घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी माजी एसपीओ फैयाज अहमद (SPO Fayaz Ahmad ) आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. या गोळीबारात माजी पोलीस अधिकारी अहमद यांची मुलगीही गंभीर जखमी झाली होती. तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अतिरेक्यांच्या गोळीबारात झालेल्या मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. रात्री ११ च्या सुमारास हा गोळीबार झाला. या गंभीर हल्ल्यानंतर सुरक्षारक्षकांनी (jammu Kashmir Police) परिसराला घेराव घालून, सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

    काश्मीर पोलिसांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. दहशतवादी अवंतीपुरा भागातील हरिपरिगावात घुसले. त्यांनी एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरात शिरुन अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये अहमद यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आधी पत्नी आणि नंतर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यानंतर तिन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे माजी एसपीओ फैयाज अहमद यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलीचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.यामध्ये अहमद यांची पत्नी राजा बानो आणि मुलगी राफिया जान  यांचा समावेश आहे. राफिया जानची प्रकृती अत्यंत गंभीर होती, त्यामुळे तिच्यावर श्रीनगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु होते.