पुलवामामध्ये मजुरांवर दहशतवाद्यांचा हल्ला; एकाचा मृत्यू

तीन दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील आलोचीबाग भागात पोलीस दलावरही हल्ला केला होता, नंतर ते पळून गेले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    श्रीनगर : पुलवामा (Pulwama) येथे दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) बिहारी मजुरांवर हल्ला (Bihari Labour) केला आहे. गदूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड फेकले आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक मजूर ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu-Kashmir Police) ही माहिती असून परिसरात नाकाबंदी (Blockade) केली आहे.

    तीन दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील आलोचीबाग भागात पोलीस दलावरही हल्ला केला होता, नंतर ते पळून गेले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    मोहम्मद मुमताज असे मृत मजुराचे नाव असून तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल अशी जखमींची नावे असून, दोघेही बिहारमधील रामपूरचे रहिवासी आहेत, दोघांची प्रकृती स्थिर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्या कामगारांवर हल्ले वाढवले ​​होते, पण गेल्या दोन महिन्यांपासून अशा टार्गेट किलिंगच्या घटना कमी झाल्या होत्या.