जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा फुसका बार, ग्रेनेड तर फेकलं पण…

जम्मू काश्मीरमधील कठुआ मंदिर परिसरात दहशतवाद्यांनी एक ग्रेनेड फेकले. मात्र या ग्रेनेडचा नेम चुकल्यामुळे ते मंदिरापासून दूर असलेल्या रिकाम्या भागात पडले. त्या ठिकाणी ते फुटल्यामुळे मोठा धमाका झाला आणि परिसरात घबराट पसरली.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्म्मू आणि काश्मीर भागात सातत्यानं काही ना काही कुरघोडी सुरूच ठेवल्या आहेत. नुकताच दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न चुकल्यामुळे दहशतवाद्यांचा हा प्रयत्न फोल ठरलाय.

जम्मू काश्मीरमधील कठुआ मंदिर परिसरात दहशतवाद्यांनी एक ग्रेनेड फेकले. मात्र या ग्रेनेडचा नेम चुकल्यामुळे ते मंदिरापासून दूर असलेल्या रिकाम्या भागात पडले. त्या ठिकाणी ते फुटल्यामुळे मोठा धमाका झाला आणि परिसरात घबराट पसरली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कठुआतील हिरानगर भागात असणाऱ्या मंदिरावर दहशतवाद्यानी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता या हल्ल्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळतेय.

जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटना सातत्यानं घडतायत. काही दिवसांपूर्वीच पुँछ भागात चार दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यात आलेले दहशतवादीदेखील ग्रेनेड हल्ला कऱण्याच्या तयारीत होते. त्यानंतर आता पुन्हा बुधवारी ही घटना घडल्यामुळे खळबळ उडालीय.

जम्मू काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्विघ्न आणि यशस्वीरित्या पार पडल्यामुळे दहशतवादी संघटना खवळल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा विडाच दहशतवादी संघटनानांनी उचलल्याची माहिती मिळतेय. मात्र आतापर्यंत अशा प्रकारे हल्ल्याचे अनेक प्रयत्न जम्मू काश्मीर पोलीस आणि सैन्य दलानं उधळून लावले आहेत.