The biggest income tax evasion in the country till date! Take Rs 52 crore in tax and refund the rest; Perfume trader Piyush Jain's demand in court

उत्तर प्रदेशातील परफ्यूम व्यापारी पीयूष जैन यांनी छापेमारीत जप्त करण्यात आलेले रक्कम परत देण्याची मागणी केली आहे. कोट्यवधी रुपये कर चुकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कानपूरचा अत्तर व्यापारी पियुष जैन याने जप्त केलेल्या पैशांची मागणी करत कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाकडून 52 कोटी रुपयांचा कर आणि दंड कापून उर्वरित रक्कम परत देण्यात यावी अशी मागणी त्याने केली आहे(The biggest income tax evasion in the country till date! Take Rs 52 crore in tax and refund the rest; Perfume trader Piyush Jain's demand in court).

  कानपूर : उत्तर प्रदेशातील परफ्यूम व्यापारी पीयूष जैन यांनी छापेमारीत जप्त करण्यात आलेले रक्कम परत देण्याची मागणी केली आहे. कोट्यवधी रुपये कर चुकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कानपूरचा अत्तर व्यापारी पियुष जैन याने जप्त केलेल्या पैशांची मागणी करत कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाकडून 52 कोटी रुपयांचा कर आणि दंड कापून उर्वरित रक्कम परत देण्यात यावी अशी मागणी त्याने केली आहे(The biggest income tax evasion in the country till date! Take Rs 52 crore in tax and refund the rest; Perfume trader Piyush Jain’s demand in court).

  14 दिवसांची कोठडी

  पीयूष जैन यांनी जीएसटी इंटेलिजेंस डायरेक्टोरेट जनरलला (डीजीजीआय) कर आणि दंड वजा करून त्यांच्या घर आणि परिसरातून जप्त केलेली मोठी रक्कम परत करण्यास सांगितले आहे. करचुकवेगिरीच्या आरोपाखाली जैनला अटक करण्यात आली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

  इतिहासातील सर्वात मोठी जप्ती

  डीजीजीआयचे विशेष सरकारी वकील अमरीश टंडन यांनी न्यायालयाला माहिती दिली की, जैन यांनी कर चुकवल्याची कबुली दिली आहे आणि करचुकवेगिरी आणि दंडासह 52 कोटी रुपये थकित आहेत. त्याच वेळी, जैन यांच्या वकिलाने डीजीजीआयला जैन यांच्यावरील दंड म्हणून कापून उर्वरित रक्कम परत करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. इतिहासातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या जप्तींपैकी एक, डीजीजीआयने कानपूर आणि कन्नौजमधील पीयूष जैन यांच्या मालकीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकून 196 कोटी रुपयांहून अधिक रोख, 23 किलो सोने आणि 6 कोटी रुपयांचे चंदन तेल जप्त केले होते.

  ‘ती’ रक्कम भारत सरकारकडेच राहणार

  डीजीजीआयचे वकील अमरीश टंडन म्हणाले की, जैन यांच्या घरातून जप्त करण्यात आलेली रक्कम ही करचोरी केलेली आहे, त्यामुळे ती परत केली जाणार नाही. जर जैन यांना 52 कोटी रुपयांचा अतिरिक्त दंड भरायचा असेल तर डीजीजीआय तो स्वीकारेल. जैन यांच्या कानपूर येथील निवासस्थानातून जप्त केलेले 177 कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा करण्यात आले असून ते भारत सरकारकडेच राहतील, असे टंडन यांनी न्यायालयाला सांगितले.