The boat rally hit the BJP hard; The names of BJP office bearers sank in Dal Lake

श्रीनगर :  श्रीनगरातील डल झीलमध्ये रविवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. जम्मू काश्मिरातील डीडीसी निवडणुकीच्या सभेसाठी जात असलेल्या या नावेमध्ये भाजपाचे पदाधिकारी होते. प्राप्त माहितीनुसार घटनास्थळी अनेक वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

बोट रॅलीत अनेक बोटींचा समावेश होता. त्यापैकी एक बोट सरोवरात उलटली. तथापि सर्व लोकांना वाचविण्यात यश आले. बुडणाऱ्यांमध्ये काही पत्रकारांचाही समावेश होता. त्यांचे कॅमेरे व अन्य उपकरण मात्र सरोवरातील पाण्यात बुडाले.

प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपाचे राष्ट्रीय सचिव तरुण चुघ यांच्या नेतृत्वात भाजपाने श्रीनगरातील डल झीलमध्ये निवडणूक सभेचे आयोजन केले होते. भाजपा प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुरक्षित असून कोणीही सरोवरात बुडाले नाही असे ते म्हणाले.

जम्मू काश्मिरातील जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीत सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडले. या टप्प्यातही मतदारांनी हिरिरीने भाग घेतला. व भरघोस मतदान केले. सहाव्या टप्प्याच्या मतदानात २०७१ केंद्रांवर मतदान झाले. या टप्प्यात ३१ जागांवर मतदान झाले. ज्यामध्ये काश्मिरातील १४ आणि जम्मूतील १७ जागांचा समावेश आहे. एकूण ७४८३०१ मतदारांनी आपला मताधिकार बजावला.