‘या’ राज्यात नाईट कर्फ्यूला विरोध होताच मुख्यमंत्र्यांनी घेतला यू-टर्न, काय आहे यामागील कारण?

कर्नाटक सरकारने (Government of Karnataka) नाईट कर्फ्यू लागू करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक समितीने दिलेल्या सल्ल्याचे कारण देत कर्नाटक सरकारने यू-टर्न घेतला आहे.

बंगळुरू : नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेन (Corona Virus Strain) , नाताळ, आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी पाहून महाराष्ट्र सरकारने नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू केला होता. यानंतर लगेचच कर्नाटक सरकारनेही (Government of Karnataka) नाईट कर्फ्यू लागू करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक समितीने दिलेल्या सल्ल्याचे कारण देत कर्नाटक सरकारने यू-टर्न घेतला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा यांनी बुधवारी ट्विट करून नाईट कर्फ्यूबाबत माहिती दिली होती. यानुसार २४ डिसेंबरपासून २ जानेवारी २०२१ पहाटेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू होत असल्याचे ते म्हणाले होते. तसेच २४ डिसेंबरच्या रात्री नाताळचा सण म्हणून लोकांना कोरोना गाईडलाईनमधून सूट दिली जाणार होती. मात्र, लोकांचा विरोध होऊ लागताच तांत्रिक समितीने दिलेल्या सल्ल्याचे कारण देत कर्नाटक सरकारने यू-टर्न घेतला आहे.

नाईट कर्फ्यूची काही गरज नव्हती. लोकांची मते पाहून, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत व अधिकाऱ्यांशी बोलून हा निर्णय मागे घेण्यात येत आहे. मात्र, लोकांनी मास्क, हात वारंवार धुणे, सोशल डिस्टन्सिंग आदी काळजी घ्यावी. यामुळे कोरोनाला रोखता येईल, असे
येडीयुराप्पा यांनी सांगितले.