भारताचा नकाशा असलेल्या डिझाईनचा केक कापण्याबाबत कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

शभक्ती म्हणजे केवळ झेंडे फडकावणे, घोषणा देणे नाही, तर जो चांगला प्रशासनासाठी लढतो किंवा प्रयत्न करतो. राष्ट्रीय सन्मानाचे प्रतिक देशभक्तीच्या समानार्थी असू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं. न्यायमूर्तींनी रबिंद्रनाथ टॅगोर यांच्या एका वाक्याचा उल्लेख केला, देशभक्ती हे आमचे अंतिम आध्यात्मिक साध्य असू शकत नाही, मला मानवतेचा शोध घ्यायचा आहे. मी हिऱ्याच्या किंमतीमध्ये काचेचा ग्लास विकत घेणार नाही, तसेच मी देशभक्तीला मानवतेच्या वरचढ होऊ देणार नाही.

    चेन्नई: देशाच्या स्वाभिमान, सन्मान असलेल्या भारताच्या नकाशाच्या आकारातील तिरंगा आणि मध्ये अशोक चक्राचे डिझाईन असलेला केक कापणे म्हणजे देशविरोधी कृत्य किंवा राष्ट्राच्या सन्मानाचा अपमान नाही, असा महत्त्वाचा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे. (the Prevention of Insults to National Honour Act,१९७१) अंतर्गत हे देशाच्या सन्मानाचा अपमान ठरु शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती एन आनंद व्येंकटेश यांनी २०१३ मधील एका खटल्या प्रकरणी ही टिप्पणी केली असून देशभक्ती आणि देशाच्या सन्मानाविषयी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. यात काही शंका नाही भारतासारख्या लोकशाही देशामध्ये राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे. पण, त्याबाबतचा अतिपणा देशाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या गौरवशाली भूतकाळाच्या दृष्टीने चांगले नाही, असं ते म्हणाले आहेत.
    ख्रिस्मस दिनादिवशी एका केकवर भारताच्या नकाशाच्या आकारातील तिरंगा आणि त्यामध्ये अशोक चक्र दाखवण्यात आले होते. हा के कापण्यात आला होता आणि जवळपास २५०० लोकांना वाटण्यात आला होता. या कार्यक्रमाला कोईंबतूर जिल्हाधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावली होती. शिवायन अनेक धार्मिक नेते आणि एनजीओ सदस्य या कार्यक्रमासाठी आले होते. याविरोधात डी सेंथीकुमार यांनी तक्रार दाखल केली होती. केकवर भारतीय तिरंगा दाखवण्यात आला होता. त्यामुळे हे (The Prevention of Insults to National Honour Act, १९७१) नुसार देशाचा सन्मानाचा अपमान असल्याची तक्रार करण्यात आली होती. याअंतर्गत ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.

    भारतीय तिरंगा दाखवणारा केक कापल्याप्रकरणी कोर्टाने मागील काही संदर्भ तपासले. कोर्टाने यावेळी म्हटलं की, एका कृतीमागील एखाद्याचा हेतू लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते. शिवाय त्यांचा देशाच्या सन्मानाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता एका कार्यक्रमामध्ये केक कापण्यात आल्याने देशाचा सन्मान कमी होतो का? स्वातंत्र्यादिवशी किंवा प्रजासत्ताक दिनादिवशी अनेक जण तिरंगा दर्शवणारे कपडे परिधान करतात. त्यांच्या देशाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसतो. शिवाय कागदाचे झेंडे रस्त्यावर टाकून देण्यात येतात. त्यांच्याविरोधातही (The Prevention of Insults to National Honour Act 1971) अतर्गंत गुन्हा दाखल केला जावा का, याचं उत्तर नकारात्मकच येईल, असं कोर्टाने म्हटले .

    देशभक्ती म्हणजे केवळ झेंडे फडकावणे, घोषणा देणे नाही, तर जो चांगला प्रशासनासाठी लढतो किंवा प्रयत्न करतो. राष्ट्रीय सन्मानाचे प्रतिक देशभक्तीच्या समानार्थी असू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं. न्यायमूर्तींनी रबिंद्रनाथ टॅगोर यांच्या एका वाक्याचा उल्लेख केला, देशभक्ती हे आमचे अंतिम आध्यात्मिक साध्य असू शकत नाही, मला मानवतेचा शोध घ्यायचा आहे. मी हिऱ्याच्या किंमतीमध्ये काचेचा ग्लास विकत घेणार नाही, तसेच मी देशभक्तीला मानवतेच्या वरचढ होऊ देणार नाही.