उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे पुनरागमन! मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय भाजपाला भोवणार

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या निर्णयाबाबत विचारणा करण्यात आली असता ३५ टक्के लोकांनी भाजपाला फायदा होणार असल्याचे तर ४७ टक्के लोकांनी नकारात्मक उत्तर दिले. दुसरीकडे, २२ टक्के लोकांनी तीरथसिंह यांचे कामकाज अत्यंत उत्कृष्ट असल्याचे तर २२ टक्के लोकांनी समाधानी नसल्याचे आणि २५ टक्के लोकांनी अंशत: समाधानी तर ८ टक्के लोकांनी उत्तर देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.

  देहरादून :  उत्तराखंडमध्ये तीरथ सिंह रावत यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने चार वर्षे पूर्ण केली आहेत. या सरकारच्या कामकाजाबाबत एबीपी-सी व्होटरने सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात उत्तराखंडमध्ये सद्यस्थितीत निवडणुका झाल्यास भाजपाला हादरा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, राज्यात काँग्रेसची सत्ता स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेक्षणात उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या निर्णयाचा भाजपाला फायदा होणार नसल्याचेही म्हटले आहे.

  उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या निर्णयाबाबत विचारणा करण्यात आली असता ३५ टक्के लोकांनी भाजपाला फायदा होणार असल्याचे तर ४७ टक्के लोकांनी नकारात्मक उत्तर दिले. दुसरीकडे, २२ टक्के लोकांनी तीरथसिंह यांचे कामकाज अत्यंत उत्कृष्ट असल्याचे तर २२ टक्के लोकांनी समाधानी नसल्याचे आणि २५ टक्के लोकांनी अंशत: समाधानी तर ८ टक्के लोकांनी उत्तर देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.

  निष्कर्ष

  विधानसभा निवडणुका झाल्यास काँग्रेसला ४१ टक्के तर भाजपाला ३८ टक्के, बसपा ४ टक्के, आम आदमी पक्ष ९ टक्के आणि इतर पक्षांना ८ टक्के मताधिक्य मिळण्याची शक्यता.

  काँग्रेसला सर्वाधिक जागा

  उत्तराखंडमध्ये ७० विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी काँग्रेसला सर्वाधिक ३२ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सत्तारूढ भाजपाला २४  ते ३० आणि बसपाच्या झोळीत ०-६ आणि आम आदमी पक्षाला २-८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

  संभाव्य निकाल

  पक्ष २०१७-२२ काँग्रेस ११ ३२-३८ भाजपा ५७ २४-३० आप ० २-८ बसपा ० ०-६ अन्य २ ०-३