प्रेयसीला शॉपिंगला नेले आणि नंतर… पोलिस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये होणाऱ्या वधूची तिच्याच  वराने गळा आवळून खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे. लग्नास पाच दिवस बाकी असताना हा प्रकार झाल्याने वधूच्या कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहेत. दरम्यान पोलिसांनी संशियतास अटक केली असून हा खून विवाह मान्य नसल्याच्या कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती उघड होत आहे.

    मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये होणाऱ्या वधूची तिच्याच  वराने गळा आवळून खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे. लग्नास पाच दिवस बाकी असताना हा प्रकार झाल्याने वधूच्या कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहेत. दरम्यान पोलिसांनी संशियतास अटक केली असून हा खून विवाह मान्य नसल्याच्या कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती उघड होत आहे.

    टीना आणि जतीन यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातूनच या दोघांचा विवाह ठरला होता. हा विवाह मुरादाबाद येथे होणार होता. परंतु जातीला विवाह मान्य नसल्याचे कारण पुढे करीत त्याने टीनाचा खून केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. सोमवारी टीनाला जतीनचा फोन आला होता. त्याने आपल्याला लग्नासाठी काही साड्या खरेदी करायच्या आहेत असे सांगून तिला भेटण्यास बोलावले.

    सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टीनाच्या आईने तिला नजीकच्या बसस्थानकावर नेऊन सोडले, असे लग्न समारंभासाठी आलेले टीनाचे नातेवाईक विपिन यांनी पोलिसांना सांगितले. जतीन घरी परत आला तेव्हा टीना त्याच्यासमवेत नव्हती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, पण ती सापडू शकली नाही. याच दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास पोलिसांना टीनाचा मृतदेह गावच्या वेशीबाहेर रस्त्यावर पडलेला दिसला होता.

    हे सुद्धा वाचा