The husband asked for a divorce as he did not say that the menstrual period came on the wedding day

गुजरात : लग्नात मासिक पाळी आल्याचं सांगितलं नाही म्हणून नवऱ्याने घटस्फोट मागितल्याची धक्कादायक घटना गुजरात मध्ये घडली आहे. लग्नाच्या दिवशी पाळी आल्याचे न सांगून माझा आणि माझ्या आईचा विश्वास घात केला असा आरोप या नवरदेवाने केला आहे.

वडोदरा येथे राहणाऱ्या एका जोडप्याचा  जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात  विवाह सोहळा पार पडला होता. पती एका खासगी कंपनीत काम करतो, तर त्याची पत्नी शिक्षिका आहे.

लग्नाच्या दिवशीच तिला मासिक पाळी आली होती. मासिक पाळी असताना तिने लग्नाचा विधी  केला. त्यानंतर मंदिरात जाण्याची वेळ आली, तेव्हा पत्नीने मासिक पाळीविषयी सांगितले, असं पतीने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

जगभरात महिला आणि कार्यकर्ते मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, समाजाच्या मानसिकेतत फरक पडत नसल्याचे या घटनेवरुन पून्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.