The photo of the actress was pasted on paper; Bhongal management of education department

या प्रकरणात या विद्यार्थ्याने मुद्दाम अभिनेत्रीचा फोटो लावल्याचा आरोप करत त्याला नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्याचा निकालही रद्द करण्यात आला आहे. जहानाबाद जिल्ह्यातील परीक्षार्थी ऋषिकेश कुमार याने परीक्षेचा फॉर्म भरत असताना आपल्या फोटोऐवजी मल्याळम अभिनेत्रीचा फोटो अपलोड केला.

    पाटणा : बिहारमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका परीक्षार्थीने आपल्या जागी चक्क एका मल्याळम अभिनेत्रीचा फोटो लावला आणि विशेष बाब म्हणजे तो या परीक्षेत पासही झाला आहे. ऋषिकेश कुमार नावाच्या एका विद्यार्थ्याने 2019च्या माध्यमिक शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरताना अभिनेत्रीचा फोटो लावला. तो पास झाला. मात्र त्याच्या गुणपत्रिकेवर याच अभिनेत्रीचा फोटो दिसत होता.

    या प्रकरणात या विद्यार्थ्याने मुद्दाम अभिनेत्रीचा फोटो लावल्याचा आरोप करत त्याला नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्याचा निकालही रद्द करण्यात आला आहे. जहानाबाद जिल्ह्यातील परीक्षार्थी ऋषिकेश कुमार याने परीक्षेचा फॉर्म भरत असताना आपल्या फोटोऐवजी मल्याळम अभिनेत्रीचा फोटो अपलोड केला.

    बिहार शैक्षणिक महामंडळाने सर्व परीक्षार्थ्यांना अर्जातल्या चुका सुधारण्याची संधी दिली होती. मात्र, तरीही ऋषिकेशने कोणताही बदल केला नाही. त्यामुळे हा फोटो तसाच राहिला. त्यामुळे ऋषिकेशच्या अॅडमीट कार्डवरही हाच फोटो छापून आला. याहून विशेष गोष्ट म्हणजे हा मुलगा याच अॅडमीट कार्डवर परीक्षाही देऊन आला.

    बिहार बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे की, फोटोच्या समस्येमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यांच्या आधारावरही परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. या परीक्षेत हा मुलगा पासही झाला, तरीही त्याने फोटो बदलला नाही. जेव्हा त्याची गुणपत्रिका व्हायरल होऊ लागली, तेव्हा बिहार बोर्ड अडचणीत आले. त्यामुले बोर्डाने त्याला नोटीस पाठवली आणि त्याचा निकाल रद्द करण्यात आला. या प्रकरणात आपण कडक कारवाई करणार असल्याचे बिहार बोर्डाने सांगितले.