The streets of the village are as smooth as Katrina's cheeks; The tongues of the Congress ministers slipped

राजस्थानमधील फेरबदलानंतर ग्रामविकास राज्यमंत्री झालेल्या राजेंद्र गुडा यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या विधानसभा मतदारसंघात पोहोचलेल्या मंत्री गुढा यांच्याकडे लोकांनी खराब रस्त्यांबद्दल तक्रार केली. त्यानंतर त्यांनी पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्यांना माझ्या गावात कतरिना कैफच्या गालासारखे रस्ते बनवा, असे निर्देश दिले(The streets of the village are as smooth as Katrina's cheeks; The tongues of the Congress ministers slipped).

    झुंझुनू : राजस्थानमधील फेरबदलानंतर ग्रामविकास राज्यमंत्री झालेल्या राजेंद्र गुडा यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या विधानसभा मतदारसंघात पोहोचलेल्या मंत्री गुढा यांच्याकडे लोकांनी खराब रस्त्यांबद्दल तक्रार केली. त्यानंतर त्यांनी पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्यांना माझ्या गावात कतरिना कैफच्या गालासारखे रस्ते बनवा, असे निर्देश दिले(The streets of the village are as smooth as Katrina’s cheeks; The tongues of the Congress ministers slipped).

    अधिकाऱ्याला बजावताना गुढा म्हणाले की, माझ्या गावातील रस्ते हेमामालिनी यांच्या गालाप्रमाणे बनवा. त्यानंतर लगेच त्यांनीच हेमामालिनी आता म्हातारी झाल्याचे सांगितले आणि जनतेला विचारले की आजकाल कोणती अभिनेत्री चर्चेत आहे, त्यावर उपस्थितांनी कतरिना कैफचे नाव घेतले.

    त्यानंतर, माझ्या भागात कतरिना कैफच्या गालासारखा गुळगुळीत रस्ते बनवा, असे ते म्हणाले. बसपातून काँग्रेसमध्ये आलेल्या राजेंद्रसिंह गुढा यांना अशोक गहलोत यांनी नुकतेच राज्यमंत्री केले आहे.