प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आरोपी शिक्षकानं विद्यार्थिनीला कॉल केल्यानंतरची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओमध्ये आरोपीनं यापूर्वी देखील बऱ्याच विद्यार्थिनींना आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची कबुली दिली आहे. आरोपी शिक्षकानं इतर अनेक विद्यार्थिनींची नावं घेऊन चुकीच्या टिप्पण्या देखील केल्या आहेत.

    परीक्षेत नापास करण्याची धमकी देत शिक्षकाने क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने याबाबत तक्रारदिल्यानंतर आरोपीला शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीही आरोपीने अनेक विद्यार्थिनीसोबत अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी शिक्षक तामिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्ह्यातील मुदुकुलाथूर येथील सरकारी अनुदानित शाळेत विज्ञान विषय शिकवतो. परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थिनीं कोचिंग देण्याच्या बहाण्याने मोबाईल नंबर घ्यायचा. त्यानंतर कोणताही बहाणा करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा त्याचबरोबर फोन करून अश्लील गप्पा मारायचा.

    संबंधित आरोपी शिक्षकानं विद्यार्थिनीला कॉल केल्यानंतरची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओमध्ये आरोपीनं यापूर्वी देखील बऱ्याच विद्यार्थिनींना आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची कबुली दिली आहे. आरोपी शिक्षकानं इतर अनेक विद्यार्थिनींची नावं घेऊन चुकीच्या टिप्पण्या देखील केल्या आहेत. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचारासह बलात्कार आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.