बायकोनं ब्रेकऐवजी दाबलं एक्सिलेटर आणि पुढे होत्याचं झालं नव्हतं…

इंदोरच्या ( Indore ) राजीव गांधी चौकात एका भरधाव कारनं तीन रिक्षांना (Auto) धडक दिली. १०० पेक्षाही जास्त वेगात ही कार धावत होती. त्यानंतर ही कार थेट बॅरिकेट्स ( Barricades ) तोडून पलीकडे उभ्या असलेल्या रिक्षांना धडकली.

भोपाळ : गाडी शिकताना किंवा चालवताना (Learning or Driving a car) नेहमी सतर्क (Alert) असणे गरजेचे आहे. नाहीतर अपघात (Accident) आणि इतर धोक्याच्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते. परंतु मला कार चालवायचीच आहे. म काहीही हो.. अशा प्रकारचा हट्ट एका बायकोनं (Wife) आपल्या नवऱ्याला(Husband) केला होता. परंतु बायकोचं हट्ट पुरवणं मध्य प्रदेशातील एका तरूणाला चांगलचं महागात पडलं आहे.

काल मंगळवारी दुपारी इंदोरच्या ( Indore ) राजीव गांधी चौकात एका भरधाव कारनं तीन रिक्षांना (Auto) धडक दिली. १०० पेक्षाही जास्त वेगात ही कार धावत होती. त्यानंतर ही कार थेट बॅरिकेट्स ( Barricades ) तोडून पलीकडे उभ्या असलेल्या रिक्षांना धडकली. परंतु जेव्हा कार रिक्षाला धडकली तेव्हा तरूणी घाबरली आणि तिने सीटची अदलाबदली केली. म्हणजेच काय तर मी नाही त्यातली कडी लावा आतली… आपल्या होणाऱ्या नवऱ्याला तिनं आपल्या सीटवर (Seat) बसवलं आणि ती त्याच्या सीटवर बसली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार लस्सी शॉपच्या मालकाची होणारी सून चालवत होती. वासुदेव आहुजा यांचा मुलगा आशिष आहुजा आणि त्याची होणारी बायको जागृती कारमधून जात होते. तिला नीट ड्रायव्हिंग येत नव्हतं. त्यामुळे तिने चुकून ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय ठेवला आणि कार शंभरपेक्षा अधिक स्पीडनं गेली आणि कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे थेट रस्त्यावरील एकापाठोपाठ उभ्या असलेल्या तीन रिक्षांना धडक दिली. त्यानंतर रिक्षा उडून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यातील लोक जवळपास १० फूट उंच उडून जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.