homeless laxmibai in modi ad

कोलकाता(kolkata) येथील जवळपास सर्वच वर्तमानपत्रात(advertisement by modi government २५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान आवास योजनेची(pantpradhan awas scheme) जाहिरात छापून आली होती. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत एका महिलेचा फोटोही छापण्यात आला आहे. या महिलेला(homeless women) पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळाल्याचे सांगण्यात आले.

  कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी संकल्प पत्र जाहीर केले आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्यात येईल, असे आश्वासन भाजपाकडून देण्यात आले आहे. तर, दुसरीकडे वर्तमानपत्रात जाहिरातांची भडीमार सुरू आहे. मात्र, यातीलच एका जाहिरातीबाबत महिलेने केलेल्या दाव्यामुळे भाजपाचे पितळ उघडे पडले आहे.

  पंतप्रधान मोदींसोबत फोटो, पण…
  कोलकाता येथील जवळपास सर्वच वर्तमानपत्रात २५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान आवास योजनेची जाहिरात छापून आली होती. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत एका महिलेचा फोटोही छापण्यात आला आहे. या महिलेला पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळाल्याचे सांगण्यात आले. तसेच, ‘आत्मनिर्भर भारत-आत्मनिर्भर बांगला’ असेही या जाहिरातीत लिहिले असून बंगालमधील २४ लाख कुटुंब आत्मनिर्भर बनल्याचा दावा करण्यात आला. मात्र, हा दावा खोटा असल्याचे सांगत आजही आम्ही भाड्याच्या घरात राहत असल्याचे जाहिरातीत फोटो असलेल्या लक्ष्मीदेवी यांनी स्पष्ट केले.

  भाड्याच्याच घरात राहतो
  गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो. आम्हाला या फोटोबाबत काहीही माहिती नाही. मला कसलेही घर मिळाले नसून आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. कुटुंबातील सर्व सदस्य या घरात नीट झोपूही शकत नाहीत, एवढे लहान आमचे घर आहे. जाहिरातीत छापण्यासाठी आपला फोटो कोणी आणि कधी घेतला, हेही माहिती नसल्याचे या लाभार्थी नसलेल्या महिलेने सांगितले.

  खोटे ते खोटेच…
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या संदर्भातील जाहीरातीचा फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे. तसेच, सातत्याने सांगितल्यानंतरही खोटे ते खोटेच राहते, असे त्यांनी म्हटले. हॅशटॅग फॅक्टचेक असे म्हणत राहुल गांधींनी हे ट्विट केले आहे.