The young woman used social media as a base to seduce many people, lure young women into her trap and

तरुणीचा मागोवा घेत पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही महिला एकटी नसून टोळीने फसवणूक करत असल्याची घटना पोलिसांच्या तपासात समजली. या टोळीमध्ये एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मेरठ : सोशल मिडियाच्या माध्यमातून (social media) हल्ली अनेक फसवणूकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातील काही रंजकही आहेत. तुम्ही अनेक फसवणुकीच्या घटनाही पाहिल्या असतील. सतत सोशल मिडियावर असणाऱ्या तरुण आणि तरुणी फसवणुक (seduce ) करत असतात. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एक तरुणी (young woman ) आपल्या बोलण्याच्या शैलीने अनेक तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करत होती. अनेक जणांना या महिलेने कंगाल करुन सोडले आहे.

ही तरुणी व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून तरुणांना बळीचा बकरा बनवत होती. त्यांच्याशी बोलून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायची. जाळ्यात अडकलेल्या आशिकांना तरुणी एका हॉटेलमध्ये बोलवायची. दरम्यान त्या तरुणाचे फोटो काढून त्यांनाच ब्लॅकमेल करत होती. आतापर्यंत तिने १० जणांना आपल्या जाळ्यात ओढले आहे.

या तरुणीचा मागोवा घेत पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही महिला एकटी नसून टोळीने फसवणूक करत असल्याची घटना पोलिसांच्या तपासात समजली. या टोळीमध्ये एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिला मुजफ्फरनगरमध्ये राहत होती. आणि तिच्यासोबत असणारा तिचा साथीदार मेरठमध्ये राहतो. यांच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल आणि फसवणूक करुन साठवलेले साहित्य, आधार कार्ड, आयडी कार्ड हस्तगत केले आहे. मेरठसह अन्य जिल्ह्यांमध्ये अशा तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. यांसह अन्य घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी खबरदारीची पावले उचलली आहेत.