This is Kashmir ... the bride and groom stuck in the rain; Landslides hinder marriage

काश्मीरचे हवामान कधी जीवनाची गाडी थांबवेल, याबद्दल कोणीही काहीही सांगू शकत नाही. बारामुला जिल्ह्यात भर पावसात घरातून निघालेला नवरा दुसऱ्या दिवशीदेखील नवरीच्या घरी पोहोचू शकला नाही. तो रस्त्यातच अडकला. सासरी जाण्याचा एकच रस्ता होता, जिथे भूस्खलन झाले आहे. पावसामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचेही काम होऊ शकत नाही.

    श्रीनगर : काश्मीरचे हवामान कधी जीवनाची गाडी थांबवेल, याबद्दल कोणीही काहीही सांगू शकत नाही. बारामुला जिल्ह्यात भर पावसात घरातून निघालेला नवरा दुसऱ्या दिवशीदेखील नवरीच्या घरी पोहोचू शकला नाही. तो रस्त्यातच अडकला. सासरी जाण्याचा एकच रस्ता होता, जिथे भूस्खलन झाले आहे. पावसामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचेही काम होऊ शकत नाही.

    हे प्रकरण उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागातील आहे. उरी येथील शादरा कमलकोट येथील रहिवासी एयाज अहमद पोसवाल यांच्या घरात प्रचंड आनंद होता. घरी नृत्य आणि गायन होते. कारण त्याचे लग्न होते. सायंकाळी एयाज अहमद वधूला आणण्यासाठी वरात घेऊन निघाला. तो उरी परिसरातील आपल्या घरापासून 21 किमी अंतरावर बालाकोटला पोहोचणार होता. लग्नानंतर त्यांना त्याच रात्री वधूसह परत यायचे होते. पाऊस पडत होता म्हणून सर्व वऱ्हाड वाहनांतून विवाहस्थळी जाऊ लागले.

    पुढे जात असतानाच चौलन परिसरातील मोहरा बाज रोडवर मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्या. यामुळे वरात त्याच रस्त्यावर अडकली. मोहरा बाज रोड हा शादरा कमलकोट येथून बालाकोटला जाणारा एकमेव मार्ग आहे. वऱ्हाड माघारीही परतू शकत नव्हते. त्यामुळे वरासोबत सर्व वऱ्हाडाने संपूर्ण रात्र रस्त्यावर घालवावी लागली. शुक्रवारी सकाळी तरी मलबा हटून रस्ता दुरुस्ती केली जाईल व त्यानंतर वरात नेता येईल, अशी वऱ्हाडाला आशा होती. परंतु शुक्रवारीदेखील दिवसभर पाऊस होता.

    यामुळे रस्ता दुरुस्त करता आला नाही. शुक्रवारी उशिरा सायंकाळपर्यंतही एयाज पोसवाल मिरवणुकीसह वधूच्या घरी पोहोचू शकले नाहीत. पावसाची उघडझाप सुरूच होती.

    काश्मीरमध्ये गेल्या पाच दिवसांपासून वरच्या भागात बर्फवृष्टी, तर सखल भागात पाऊस सुरूच आहे. गुरुवारपासून हिमवृष्टी आणि पाऊस तीव्र झाला आहे. यामुळे जीवनावर परिणाम झाला आहे. अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. खराब वातावरणामुळे शुक्रवारी मेराज आलमसंबंधी श्रीनगरच्या हजरतबल दर्ग्यात आयोजित समारोहात अनेक भाविक पोहोचू शकले नाहीत.