हृदयद्रावक घटना! खेळता-खेळता एकाच कुटुंबातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू ; परिसरात पसरली शांतता

मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यलयापासून जवळपास २५ किमी लांब असलेल्या दलदलीच्या परिसरात तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोेलिसांना मिळाली असता त्यांनी या घटनेची चाचपणी केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी आपल्या मामे भाऊसोबत घराच्या आसपास खेळत होते. परंंतु त्याचवेळी पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाला. मृत पावलेल्या मुलांची नावे अरमान (८), ज्योती (८) आणि वंदना (६) अशी आहेत. त्यांनी सांगितलं की, मोहनबडोदिया या गावात दोन्ही बहिणींचं निवासस्थान आहे. परंतु या दोन्ही मुली त्यांच्या मामाच्या घरी आल्या होत्या.

    दरम्यान, मृत पावलेल्या तिघांचेही शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले होते. पोस्टमॉर्टमनंतर हे शव त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच गुलाना पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.