झुंड में शेर अकेला आता है…तीन कुत्र्यांनी लहान मुलाला घेरलं आणि पुढे जे केलं ते बघून व्हाल थक्क…..

या व्हिडिओमध्ये दोन लहान मुले दिसत आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज आहे. दोनपैकी एक मुलगी असून ती कुत्री मागे लागताच तेथून पसार होते. पण दुसरा मुलगा तिथेच अडकतो. तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की, कुत्री त्यालाही घाबरत आहेत तर तोही तिथे थांबून हिंमतीने कुत्र्यांना तेथून पळवून लावतो.

आपण एकाच मार्गाने जात असताना अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या समोर येतात. त्यामुळे आपण न घाबरता, त्यावर मात करून पुढे जायचं असतं. कारण भाऊ डर के आगे जित है… बालपणी लहानग्यांना कुत्र्यांची सर्वाधिक भिती वाटते. कारण काहीही चुकी नसताना कुत्रा एखाद्यावर भुंकला किंवा मागे लागला की त्याच्या मनात भितीचं वातावरण निर्माण होतं. परंतु एका लहान मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दोन लहान मुले दिसत आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज आहे. दोनपैकी एक मुलगी असून ती कुत्री मागे लागताच तेथून पसार होते. पण दुसरा मुलगा तिथेच अडकतो. तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की, कुत्री त्यालाही घाबरत आहेत तर तोही तिथे थांबून हिंमतीने कुत्र्यांना तेथून पळवून लावतो. या व्हिडिओतून एक संदेशही मिळतो आणि हा मुलगा काय करतो हे बघून तुम्ही त्याचं कौतुकही कराल.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धूमाकूळ घालत आहे. तसेच आतापर्यंत ४३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.