PUBG च्या नादात उडवले तीन लाख रुपये; वडिलांच्या अकाउंटवरून केले पैसे गायब

पबजी खेळण्याच्या नादात अल्पवयीन तरुणाने त्याच्या घरचे 3 लाख रुपये उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल गेम खेळण्याच्या नादापायी अनेक तरुण तरुणी पैसे उडवताना आपण पाहतो. अनेकदा आईवडिलांच्या अपरोक्ष त्यांच्या बँक खात्यातून मुले पैसे गायब करतात किंवा चुकीच्या मार्गांचा वापर करत पैसे मिळवताना दिसतात(Three lakh rupees blown in the name of PUBG; Money made from father's account disappears).

    जयपूर : पबजी खेळण्याच्या नादात अल्पवयीन तरुणाने त्याच्या घरचे 3 लाख रुपये उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल गेम खेळण्याच्या नादापायी अनेक तरुण तरुणी पैसे उडवताना आपण पाहतो. अनेकदा आईवडिलांच्या अपरोक्ष त्यांच्या बँक खात्यातून मुले पैसे गायब करतात किंवा चुकीच्या मार्गांचा वापर करत पैसे मिळवताना दिसतात(Three lakh rupees blown in the name of PUBG; Money made from father’s account disappears).

    मित्राच्या भूलथापांना आणि दबावाला बळी पडत लाखो रुपये उधळणाऱ्या एका अल्पवयीन मुलाची अशीच धक्कादायक कहाणी समोर आली आहे. राजस्थानमधील झालावाडमध्ये ई-मित्र दुकान चालवणाऱ्या एका तरुणाने अल्पवयीन मुलाला धमकावत त्याच्याकडून 3 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. कधी गोड बोलून तर कधी धमकावून शाहबाज खान नावाचा हा तरुण अल्पवयीन तरुणाकडून पैसे उकळत असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.

    पब्जी गेम खेळण्याची सवय असलेला अल्पवयीन तरुण हा त्याच्याशेजारी ई-मित्र दुकान चालवणाऱ्या शाहबाज खानकडे वारंवार जात येत असे. याच काळात पब्जीसाठी लागणारी शस्त्रे आणि इतर ऑनलाईन साहित्य करण्यासाठी पैसे खर्च करण्याची सवय त्याने अल्पवयीन मुलाला लावली. हे सगळे खरेदी करण्यासाठी रेफरल कोड घेण्यासाठी तो पैसे मागायचा आणि पब्जी खेळण्याच्या हौसेपायी अल्पवयीन मुलगा त्याला पैसे आणून द्यायचा.

    शाहबाज खानने अल्पवयीन मुलाकडून त्याच्या वडिलांच्या बँकेचे डिटेल्स मागवून घेतले. त्याचप्रमाणे त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबरदेखील घेतला. त्यानंतर या सगळ्या तपशीलांचा वापर करत पेटीएम अकाउंट सुरू केले आणि त्यासाठी स्वतःचा नवा नंबर रजिस्टर केला. सुरुवातीला आरोपीने अल्पवयीन तरुणाला 500 रुपयांचे ट्रॅन्झॅक्शन करवून घेतले आणि त्यानंतर एकमागून एक अनेक व्यवहार केले. त्यामुळे मुलांच्या वडिलांचे 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.