आधी सोशल मीडियावर लाईव्ह आणि नंतर… एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने खळबळ

चंदिगड :  पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील धारीवाल भागात एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पती, पत्नी आणि मुलगी यांनी सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी गुरदासपूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

आत्महत्या करण्याआधी ते सोशल मीडियावर लाईव्ह आले होते. मृत्यूसाठी त्यांनी 9 जणांना जबाबदार ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेश कुमार (४२), भारती शर्मा (३८) आणि त्यांची मुलगी मानसी (१६) अशी मृतांची नावे आहेत.

आत्महत्या करण्याआधी भारती यांनी एक व्हीडिओ बनविला होता. यात त्यांनी त्यांच्या मृत्यूसाठी त्यांचा भाऊ आणि इतर काही लोकांना दोषी ठरविले आहे.