अटक केलेला ‘लष्कर-ए-तोयबा’चा टॉप कमांडर चकमकीत ठार ; जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश

 जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हायवेवर हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हायवेवर जम्मू काश्मीर पोलीस तसंच सीआरपीएफ जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परिंपोरा नाका येथे पोलिसांनी एक वाहन थांबवून ओळख विचारली असता मागे बसलेल्या व्यक्तीने आपल्या बॅगेतून ग्रेनेड काढण्याचा प्रयत्न केला.

    श्रीनगर जिल्ह्यातील परिंपोरा येथे चकमकीदरम्यान जवानांनी लष्करचा कमांडर आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावरुन एके-४७ सहित मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असून ‘लष्कर-ए-तोयबा’च्या टॉप कमांडरला ठार करण्यात आलं आहे.

    जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हायवेवर हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हायवेवर जम्मू काश्मीर पोलीस तसंच सीआरपीएफ जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परिंपोरा नाका येथे पोलिसांनी एक वाहन थांबवून ओळख विचारली असता मागे बसलेल्या व्यक्तीने आपल्या बॅगेतून ग्रेनेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवानांनी तात्काळ कारवाई करत त्याला पकडलं आणि त्याच्याकडील ग्रेनेड ताब्यात घेतलं असं पोलिसांनी सांगितलं. यानंर चालक आणि त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यावेळी मास्क काढल्यानंतर ती व्यक्ती लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचं समोर आलं.

    नदीम अबरार याला सोमवारी अटक करण्यात आलं होतं. नदीम अबरार अनेक जवानांच्या तसंच नागरिकांच्या हत्येमध्ये सहभागी होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच ठार करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवादी हा नदीम अबरारचा सहकारी होता असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.