sanyatika banerjee accident

टीएमसीची राज्य सचिव आणि अभिनेत्री संयतिका बॅनर्जी ( Actress Sanyatika Banerjee Car Accident) बांकुडाहून कोलकत्ताला जाण्यास निघाली होती. त्यावेळी एका ट्रकने तिच्या कारला मागून धडक दिली. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे.

    टीएमसीची राज्य सचिव आणि अभिनेत्री संयतिका बॅनर्जीचा(Sanyatika Banerjee Car Accident) कार अपघात झाला आहे. अपघातामध्ये संयतिकाला जखमी(Sanyatika Banerjee Injured In Accident) झाली आहे. बांकुडाहून कोलकात्ताला(Kolkata) येत असताना संयतिकाच्या कारला ट्रकने मागून(Truck And Car Accident) धडक दिली आहे. वाहनचालकाला वाहन नियंत्रित न करता आल्याने हा अपघात झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच ट्रक चालकाला अटक(Truck Driver Arrested) करण्यात आली आहे.

    गुरुवारी संयतिका बांकुडाहून कोलकत्ताला जाण्यास निघाली होती. त्यावेळी एका ट्रकने तिच्या कारला मागून धडक दिली. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे. अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच संयतिका देखील जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी वर्धमान जिल्हा पोलिसांनी माहिती दिली आहे. ‘अभिनेत्रीच्या कारला मागून धडक देणाऱ्या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून हा केवळ अपघात आहे की कुणी कट रचला होता याबाबत तपास सुरु आहे’ असे पोलिसांनी म्हटले आहे.

    संयतिका ही एक अतिशय लोकप्रिय बंगाली अभिनेत्री आहे. तिने २०२१ मध्ये टीएमसीकडून बाकुडा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिचा अपघात झाल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.