UP पोलिसांनी भुताला पकडले; ही भुतं दिवस झापतात आणि रात्रभर हिंडतात

उत्तर प्रदेशातील बरेलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७ नोव्हेंबर रोजी बरेलीत दरोडा पडला होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर तो दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले आणि चौकशी सुरू केली असता धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. भूत आणि त्याच्या टोळीने हा दरोडा टाकला असल्याची गोष्ट समोर आली आहे(UP police catch ghost; These ghosts had robbed 12 lakhs).

    लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७ नोव्हेंबर रोजी बरेलीत दरोडा पडला होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर तो दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले आणि चौकशी सुरू केली असता धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. भूत आणि त्याच्या टोळीने हा दरोडा टाकला असल्याची गोष्ट समोर आली आहे(UP police catch ghost; These ghosts had robbed 12 lakhs).

    ७ नोव्हेंबर रोजी बरेलीतील नबाबगंजमध्ये व्यापारी जलीस अहमद पत्नी आणि मुलांसह घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. त्याच वेळी, सुमारे १२ मुखवटा घातलेले हल्लेखोरांनी त्याच्या घरावर छापा टाकला आणि संपूर्ण कुटुंबाला शस्त्रांच्या जोरावर ओलीस बनवून रोख आणि दागिन्यांसह सुमारे १२ लाखांचा ऐवज लुटला.

    एसएसपी रोहित सजवान यांनी सांगितले की, अनेक पथके स्थापन करून बदमाशांना पकडण्यासाठी प्रयत्न केले जाते. याचदरम्यान, मित्रांमध्ये आणि टोळीतील सदस्यांमध्ये भूत नावाने प्रसिद्ध असलेल्या फरहानच्या टोळीनेच हा दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेला २५ दिवसांनंतर पोलिसांनी या घटनेचा खुलासा करताना भूत टोळीच्या १० दरोडेखोऱ्यांना अटक केली आहे. तर दोन चोरटे अद्याप फरार आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून पाच पिस्तुलांसह लुटलेले दागिने आणि अडीच लाखांच्या रोख रकमेसह व्यावसायिकाच्या घरातून जप्त केले आहे.

    …म्हणून फरहानला भूत म्हणतात

    चौकशीदरम्यान, त्याच्या साथीदारांनी पोलिसांना सांगितले की, लोक त्याला भूत म्हणतात कारण तो दिवसा झोपतो आणि रात्रभर हिंडतो. यामुळे नातेवाईक आणि मित्र त्याला भूत म्हणू लागले. हळूहळू संपूर्ण परिसर त्याला फरहान ऐवजी भूत नावाने हाक मारू लागला. यानंतर जेव्हा तो गुन्हेगारीच्या जगात आला तेव्हा त्याच्या टोळीचे नावही भूत गँग झाले. भूत नावाच्या भीतीने छोट्या टोळ्या समोर येण्याचे धाडस जमवत नाही.