sarita aarya in bjp

उत्तराखंड महिला काँग्रेस अध्यक्ष आणि नैनितालच्या माजी आमदार सरिता आर्य (Sarita Arya) यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये (Sarita Arya Entered In BJP) प्रवेश केला आहे.

    देहरादून : उत्तराखंडमध्ये  (Uttarakhand Election 2022) १४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी उत्तराखंड महिला काँग्रेस अध्यक्ष आणि नैनितालच्या माजी आमदार सरिता आर्य (Sarita Arya) यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये (Sarita Aarya Entered In BJP) प्रवेश केला आहे.

    आर्य यांनी प्रदेश भाजप मुख्यालयात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि प्रदेश पार्टी अध्यक्ष मदन कौशिक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सरिता आर्य यांनी २०२१ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला होता. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना संजीव आर्य यांच्याकडून हार पत्करावी लागली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, सरिता यांनी वडील यशपाल आर्य यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संजीव आर्य यांना काँग्रेसकडून तिकीट मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशातच पार्टीवर नाराज होऊन सरिता आर्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.