Watch the captivating video of snowfall in Vaishnav Devi area; The tourists were also relieved

जम्मू : वैष्णो देवी तीर्थक्षेत्र परिसरात मनमोहक बर्फवृष्टी झाली आहे. या बर्फवृष्टीमुळे पर्यटकही सुखावले असून, उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

वैष्ण देवी मंदिर परिसरात बर्फवृष्टी होत असल्याने थंडीचा कडाकाही वाढला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर तसेच मंदिर परिसरात सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे.

बर्फवृष्टीचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. वैष्णौ देवी परिसरासह जम्मू काश्मिरमध्ये सर्वत्रच बर्फवृष्टी होत आहे.