पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी तब्बल ८ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यातल्या पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान होत आहे. तर शेवटच्या टप्प्याचं मतदान २९ एप्रिलला होणार आहे.

    कोलकाता : पश्चिम बंगाल ( West Bengal) आणि आसाम (Assam) विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी तब्बल ८ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यातल्या पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान होत आहे. तर शेवटच्या टप्प्याचं मतदान २९ एप्रिलला होणार आहे.

    तर आसामच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होताहेत. त्यातल्या ४७ जागांचा पहिला टप्पा आज तर शेवटच्या टप्प्याचं मतदान ६ एप्रिलला होईल. सध्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजपने सगळी ताकद पणाला लावली आहे.