राष्ट्रपती कोविंद यांनी वेतनाबाबत चर्चा करणाऱ्यांची तोंड केली बंद, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद एका समारंभाला संबोधित करताना म्हणाले की , राष्ट्रपती ही देशातील सर्वाधिक वेतन घेणारी लोकसेवक आहे मात्र त्याच प्रमाणे इतरांच्या तुलनेत कर देखील सर्वाधिक अदा केला जातो. लोक राष्ट्रपतींना ५ लाख रुपये दरमहा वेतन मिळते याची चर्चा करतात मात्र अशांना मी सांगू इच्छितो कि वेतनाबरोबरच दर महिन्याला आपल्याकडून २ लाख ७५ हजार रुपये कर म्हणून अदा केले जातात, असे स्पष्ट मत राष्ट्रपती कोविंद यांनी उपस्थितांसमोर मांडले.

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींना मिळणाऱ्या वेतनाबाबत चर्चा करणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत. राष्ट्रपतींना सर्वाधिक वेतन आहे, असे जर बोलले जात असले तर त्यांच्याकडून कर देखील तितकाच अधिक भरला जातो, असे राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान दर महिन्याला आपण २ लाख ७५ हजार रुपये कर भरतो, असे त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशमधील त्यांच्या मूळ गावी असून तेथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रपती हे सर्वाधिक वेतन घेणारे देशातील लोकसेवक आहेत. मात्र राष्ट्रपती पदाची कर्तव्य आणि जबाबदारी यांच्याबाबत चर्चा न होता त्यांना किती वेतन मिळते, याचीच जास्त चर्चा होताना दिसते.

    याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सडेतोड मत मांडले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेशमधील कानपुर देहात जिल्ह्यातील झिंझकच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी स्थानिकांशी तसेच बालपणीच्या मित्रांच्या भेटीगाठी घेतल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा हा सपत्नीक दौरा असून त्यांनी पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास केला. २५ जून रोजी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद विशेष रेल्वेने आपल्या मूळ गावी पोहोचले.