अमित शाह आणि ममता बॅनर्जींमध्ये कोण किती श्रीमंत?

निवडणुकीत कोण बाजी मारणार, प्रचारात कोण आघाडी घेणार या सगळ्या प्रश्नांसोबत कुणाची किती संपत्ती आहे, याचीही जोरदार चर्चा सध्या रंगतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे श्रीमंतीच्या आणि संप्पतीच्या बाबतीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींपेक्षा कैक पटींनी पुढे आहेत. अमित शाहांकडे ममता बॅनर्जींपेक्षा तब्बल १३३ पट अधिक संपत्ती आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं वातावरण तापायला सुरुवात झालीय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या निवडणुकीतील आपापल्या पक्षांचे प्रमुख नेते असणार, हे आता स्पष्ट झालंय.

निवडणुकीत कोण बाजी मारणार, प्रचारात कोण आघाडी घेणार या सगळ्या प्रश्नांसोबत कुणाची किती संपत्ती आहे, याचीही जोरदार चर्चा सध्या रंगतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे श्रीमंतीच्या आणि संप्पतीच्या बाबतीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींपेक्षा कैक पटींनी पुढे आहेत. अमित शाहांकडे ममता बॅनर्जींपेक्षा तब्बल १३३ पट अधिक संपत्ती आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी अर्ज भरताना अमित शाह यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला होता. त्यानुसार त्यांच्याकडे ४० कोटी ३२ लाख ७५ हजार ३०७ रुपये असल्यचं प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं होतं. शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचर्समध्ये त्यांची सुमारे २१ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्या नावे बँकेत ३७ लाख रुपयांच्या ठेवी आहेत तर ९३ हजारांची रोकड आहे. त्यांच्याजवळ ९६ लाख रुपयांचं सोनं आहे.

ममता बॅनर्जी यांची संपत्ती केवळ ३० लाख रुपये इतकीच आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी हा तपशील जाहीर केलाय. त्यांच्या नावे २७ लाख रुपयांच्या ठेवी, १८ हजारांची रोकड तर १८ हजारांचं पोस्टल सेव्हिंग आहे. त्यांनी शेअर्स, बॉंड्स किंवा डिबेंचर्समध्ये कुठलीही गुंतवणूक केलेली नाही.