‘पत्नी दररोज अंघोळ करत नाही’,तिच्या अंगाचा घाणेरडा वास येतो’  म्हणून पतीला हवाय तलाक ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भांडणांदरम्यान दोघांनी एकमेकांच्या राहणीमानावरून टोमणे मारायला सुरुवात केली. ९ महिन्यांपूर्वी या दाम्पत्याला मूल झालं, मूल झाल्यानंतरही दोघांतील वाद थांबले नाहीत.

    हुंड्यासाठी , पैश्यासाठी पत्नीला तलाक (divorces)दिल्याच्या अनेक घटना आपण ऐकलया आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील अलीगडमधील एका नवऱ्याने (Husband) अजब कारणासाठी आपल्या पत्नीला तळाखा देण्याचा निर्णय घेतला आहे. पतीच्या म्हणण्यानुसार पत्नी नियमित अंघोळ करत नाही, तिच्या अंगाचा घाणेरडा वास येतो, (her body smells foul) त्यामुळे मला तिच्या सोबत राहायचे नसल्याचे त्याने म्हटले आहे.
    पतीने दिलेले कारण ऐकून सर्वांच्या भुवया उंचावलया आहेत. तर बायकोने मात्र हे आरोप खोटे असून आपल्याला त्रास देण्यासाठी नवऱ्याने रचलेले कुभांड असल्याचा दावा केला आहे. पत्नीने हे प्रकरण महिला संरक्षण कक्षाकडे नेलं असून तूर्तास या दोघांचे समुपदेशन सुरू असून दोघांमधील वाद संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    चंडौसमध्ये राहणाऱ्या या तरुणाचा निकाह क्वार्सी इथल्या तरुणीशी झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले, मात्र नंतर दोघांत वादाला सुरुवात झाली. भांडणांदरम्यान दोघांनी एकमेकांच्या राहणीमानावरून टोमणे मारायला सुरुवात केली. ९ महिन्यांपूर्वी या दाम्पत्याला मूल झालं, मूल झाल्यानंतरही दोघांतील वाद थांबले नाहीत. वाढत्या वादामुळे महिलेने महिला संरक्षण विभागाकडे तक्रार केली. यानंतर दोघांचे समुपदेशन करण्यासाठी त्यांना समुपदेशकाकडे पाठवण्यात आले . समुपदेशकाशी बोलत असताना नवऱ्याने सांगितलं की तो त्याच्या बायकोच्या आंघोळ न करण्याच्या सवयीमुळे त्रस्त आहे. आपली बायको रोज आंघोळ करत नसून तिच्या अंगाला घाणेरडा वास येत असल्याचे नवऱ्याने सांगितले आहे. या कारणामुळेच आपल्याला तिच्यासोबत राहायचे नसल्याचे नवऱ्याने समुपदेशकाला सांगितले आहे.