‘या’ राज्याने महसूल वाढवण्यासाठी घेतलाय मोठा निर्णय, ४ शहरांमध्ये सुरु करणार लेडीज स्पेशल वाईन शॉप्स

मध्य प्रदेश राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये प्रथमच महिला वाईन शॉप्स(Wine Shops For Women In Madhya Pradesh) सुरू होणार आहेत.

    उमा भारतीसारख्या महिला नेत्या राज्यात दारूविक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना, मध्य प्रदेश(Madhya Pradesh) सरकार महसूल वाढवण्याच्या विचारात आहे. त्यामुळे सरकारी तिजोरी भरण्यासाठी सरकार महिलांसाठी वाईन शॉप (Ladies Special Wine Shops)सुरू करण्याची तयारी करत असल्याचे समजते.मध्य प्रदेश राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये प्रथमच महिला वाईन शॉप्स(Wine Shops For Women In Madhya Pradesh) सुरू होणार आहेत. एप्रिल २०२२ पर्यंत तुम्हाला मध्य प्रदेशात महिलांसाठी असे खास दुकान पाहायला मिळेल.

    मध्य प्रदेश सरकार सुरुवातीला भोपाळ, जबलपूर, इंदूर आणि ग्वाल्हेर या ४ शहरांमध्ये महिलांसाठी खास वाईन शॉप्स सुरु करणार आहे. या दुकानांमध्ये महिलांसाठी सर्व ब्रँडची वाईन उपलब्ध असेल. याठिकाणी केवळ महिलांना अनुकूल मद्य विक्री केली जाईल.

    मिळालेल्या माहितीनुसार, महिलांसाठीचे वाईन शॉप्स आठवड्यातून काही दिवसच सुरू राहणार आहेत. तसेच महिलांसाठी हे वाईन शॉप मॉल्ससारख्या सुरक्षित ठिकाणी आयोजित केले जातील. जेणेकरून महिलांना तिथे सहज जाता येईल.महिलांच्या या वाईन शॉपला मिळणारा प्रतिसादही मध्य प्रदेश सरकार चाचपणी करणार आहे. त्यानंतर महिलांना वाईन शॉपमध्ये येण्यासाठी तसेच वाइन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. त्यासाठी वाईन फेस्टिव्हलही आयोजित करता येईल. मात्र यासंदर्भात महसूल विभागाला अद्याप कोणतेही ठोस आदेश मिळालेले नाहीत.